सीबीआय पथकाने वास्को येथील गांधीनगर-वरुणापुरी येथे छापा टाकला. त्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाची (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. एटीएफ या ज्वलनशील पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी गुरुवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. तब्बल 3 हजार लीटर तेलाची तस्करी होत असल्याचे समोर आले. या प्रकरणी मुख्य संशयित विठ्ठल चव्हाणसह मंतेश पवार, महेंदर पास्सी, मैनुद्दीन शेख यांना अटक करण्यात आली.