मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओद्वारे आमदाराकडे खंडणी मागितल्या प्रकरणातील संशयित आरोपी कुकेश रौता याला म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल सशर्त जामीन मंजूर केला. संशयित कुकेश रौता याची 20 हजार रुपयांची हमी आणि तेवढ्याच रक्कमेच्या दोन हमीदारांवर जामिनावर सुटका करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने आमदाराच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात कुरेश रौता याला अटक केली होता.