कुकेश रौता याच्या जामिनावरील निवाडा न्यायालयाकडून राखीव

0
3

मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून आमदाराकडे खंडणी वसूल केल्या प्रकरणातील संशयित आरोपी कुकेश रौता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात काल पूर्ण झाली. न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निवाडा गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.
आमदाराच्या तक्रारीनंतर या खंडणी प्रकरणी मूळ ओरिसाचा रहिवासी कुकेश रौता याला गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली होती. सरकारी वकिलांनी संशयित कुकेश रौता याला जामीन मंजूर करण्यास विरोध केला. आरोपीला 41(ए) सीआरपीसी नोटीस बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तपास अधिकाऱ्याने उल्लंघन केले आहे, असा युक्तिवाद कुकेश रौता याच्या वकिलाने केला. तत्पूर्वी, न्यायालयाने रौताच्या जामीन अर्जात हस्तक्षेप करण्याची विनंती करणारा हळदोणा येथील एका मतदाराने दाखल केलेला हस्तक्षेप अर्ज फेटाळला.