बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र प्रकरणी आणखी 1 अटकेत

0
3

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र प्रकरणातील सहावा संशयित आरोपी प्रदीप ऊर्फ विक्रांत हर्ळणकर (पर्वरी) याला काल अटक केली. गुन्हा विभागाने मागील महिन्यात बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस आणून, पाच जणांना अटक केली होती. त्यात बिंदी परब (कुंभारजुवा), भावेश हर्ळणकर (चोडण), निरज गावडे (डिचोली), विष्णदास भोमकर (करमळी) आणि यशवंत खोलकर (ताळगाव) यांचा समावेश होता. या बनावट प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.