तिळारी जलसिंचन प्रकल्पाच्या ओलीत क्षेत्र विकास मंडळाने या प्रकल्पाचे ओलीत क्षेत्र असलेल्या गोव्यातील तीन तालुक्याच्या विकास योजनांसाठी 264.86 कोटी रु. एवढा निधी मंजूर केला आहे. तिळारीचे ओलीत क्षेत्र असलेल्या गोव्यातील डिचोली, बार्देश व पेडणे या तालुक्यांत ह्या विकास योजना मार्गी लावण्यात येणार आहेत. तिळारी जलसिंचन प्रकल्पाचे डिचोलीत 5130 हेक्टर, बार्देशमध्ये 5137 हेक्टर तर पेडण्यात 4254 हेक्टर एवढे ओलीस क्षेत्र आहे.
तिळारी जलसिंचन प्रकल्पाच्या विकास योजनांसाठी तिळारी जलसिंचन प्रकल्पाच्या ओलीत क्षेत्र विकास मंडळाने 2015 साली योजना निश्चित करून त्यांची आखणी केली होती. या विकास योजनांमुळे ज्या नागरिकांवर परिणाम होणार आहे त्या नागरिकांकडून सरकारने 2015 साली आक्षेप तसेच सूचना मागवल्या होत्या.