बेळगाव शहरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच बेळगाव ज्या पाच ठिकाणी हा महामेळवा पार पडण्याची शक्यता आहे त्या पाचही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. आज सोमवारपासून बेळगाव शहरातील विधानसौध या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला आहे.