थिवी कोमुनिदाद विरोधात तक्रार

0
4

कोमुनिदादच्या भागधारकांची मान्यता न घेता एका खासगी विद्यापीठाला सुमारे 2 लाख चौरस मीटर जमीन वाटप केल्याप्रकरणी थिवी कोमुनिदादचे अध्यक्ष, मुख्यत्यार, खजिनदार व इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कोलवाळ पोलीस स्थानकात काल तक्रार दाखल करण्यात आली. पुणे येथील एका संस्थेला खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी थिवी कोमुनिदादची सुमारे 2 लाख चौरस मीटर जमीन दीर्घ भाडेपट्टीवर दिल्याची तक्रार आहे. गेल्या कित्येक ममहिन्यांपासून खासगी विद्यापीठाचा विषय गाजत आहे. स्थानिक नागरिकांनी खासगी विद्यापीठाला जमीन देण्यास विरोध केलेला आहे. थिवी कोमुनिदादच्या गावकऱ्यांच्या गटाने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यासोबत हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांची उपस्थिती होती.