दोन दिवसांत भाजपचा पर्दाफाश : केजरीवाल

0
5

दोन दिवसांत भाजपचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. भाजपने महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला याचा पर्दाफाश दोन दिवसांत करेन, असे केजरीवाल म्हणाले. विशेष म्हणजे गुरुवारी मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी केजरीवालांनी हा सनसनाटी दावा केला आहे.