राहुल गांधींचा ताफा गाझीपूर सीमेवर रोखला

0
3

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून बुधवारी रणकंदन माजले. उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलकडे निघालेल्या काँग्रेस नेत्यांचा ताफा संसदेपासून सुमारे 30 किलोमीटरवर असलेल्या गाझीपूर सीमेवर अडवला गेला. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची पोलिसांनी नाकाबंदी केली. संसदेच्या दोन्ही सदनांतही काँग्रेस नेत्यांच्या अडवणुकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेचा निषेध करत काँग्रेसच्या सदस्यांनी दोन्ही सदनांचा सभात्याग केला. संभलमध्ये मुघलकालीन शाही जमा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारानंतर तणावाची परिस्थिती आहे. पीडित कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी संभलच्या दौऱ्यावर निघाले होते. मात्र त्यांना पोलिसांनी अडवले.