सरकारी तेल कंपन्यांकडून 1 डिसेंबर 2024पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे. इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोंच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 16.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील महिन्यात या सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 19 किलोंचा व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांवर मिळत होता. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोंच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किंमतींचे परीक्षण करण्यात येते.