आंध्र प्रदेश राज्यात वक्फ बोर्ड बरखास्त

0
7

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्य वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. पूर्वीच्या जगन मोहन सरकारमध्ये त्याची स्थापना झाली होती. 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, विद्यमान सरकारने मागील सरकारच्या काळात अल्पसंख्याक कल्याण विभागाने जारी केलेला सरकारी आदेश रद्द केला आहे. आदेशात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. जगन सरकारमध्ये 21 ऑक्टोबर 2023 रोजी वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली. शेख खाजा (मुतवल्ली), आमदार हाफीज खान आणि आमदार रुहुल्ला यांना वक्फ बोर्डाचे सदस्य करण्यात आले. इतर 8 जण वक्फ बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य होते. तथापि, शेख खाजा आणि वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेश (ॠज) 47 च्या वैधतेला अनेक रिट याचिकांमध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.