मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माणगाव बाजार पेठ ते मुगवली फाटा इथपर्यंत वाहतूक ठप्प झाली असून जवळपास 4 किलोमीटरपर्यंत वाहने रांगेत उभी होती. कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर असून पर्यटकांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न आले. तर वाहतुकीची ही कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. दरम्यान, रात्री उशिरा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटली.