‘इफ्फी’ः इंडियन पॅनोरमामधील चित्रपट, माहितीपट जाहीर

0
2

25 चित्रपट व 20 माहितीपटांचा समावेश तीन मराठी चित्रपटांचाही समावेश

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) मुख्य भाग असलेल्या इंडियन पॅनोरमाने 55 व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी निवड झालेल्या 25 फीचर फिल्म्स (चित्रपट) आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची (माहितीपट) यादी जाहीर केली.

एकूण 384 समकालीन भारतीय चित्रपटांच्या विस्तृत श्रेणीतून, सिनेमाच्या मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह 25 चित्रपटांचा संच निवडण्यात आला आहे. भारतीय पॅनोरमा 2024 चा उद्घाटनपर (ओपनिंग) चित्रपट म्हणून, निवड समितीने रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर (हिंदी) या चित्रपटाची निवड केली आहे. याशिवाय, इंडियन पॅनोरमामध्ये 262 चित्रपटांच्या श्रेणीतून निवडलेल्या 20 नॉन-फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जातील. नॉन-फीचर फिल्म्सचे पॅकेज (संच), नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांच्या दस्तऐवजीकरण, तपास, मनोरंजन आणि समकालीन भारतीय मूल्ये प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेचा प्रत्यय देतील.

माहितीपटाचे उद्घाटन ‘घर जैसा कुछ’ने
नॉन-फिचर श्रेणीतील उद्घाटनपर चित्रपट म्हणून हर्ष संगानी दिग्दर्शित ‘घर जैसा कुछ (लडाखी)’, या चित्रपटाची निवड केली आहे.
फीचर चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर (हिंदी), केरेबेटे (कन्नड), वेंक्या (कन्नड), जुईफूल (आसामी), महावतार नरसिम्हा (हिंदी), जिगरथंडा डबल एक्स (तमिळ), आदुजीवितम्‌‍ (मल्याळम), आर्टिकल 370 (हिंदी), श्रीकांत (हिंदी), आमार बॉस (बंगाली), ब्रह्मयुगम (मल्याळम), 35 चिन्ना कथा काडू (तेलुगु), राडोर पाखी (आसामी), लेव्हल क्रॉस (मल्याळम), कारकेन, भूतपोरी (बंगाली), ओंको की कोथिन (बंगाली), कारखानू (गुजराती), 12वी फेल (हिंदी), मंजुम्मेल बॉईज, (मल्याळम), स्वर्गरथ (आसामी) आणि कल्की 2898 एडी (3डी, तेलुगु) या चित्रपटांचा समावेश आहे.

भारतीय पॅनोरमा 2024 मध्ये निवडलेल्या 20 नॉन फीचर चित्रपटांमध्ये 6-ए आकाश गंगा (हिंदी), अमर आज मारेगा (हिंदी), अम्माज्‌‍ प्राईड (तमिळ), बही – ट्रेसिंग माय न्सेस्टर्स ( हिंदी), बॅलड ऑफ द माउंटन (हिंदी), बट्टो का बुलबुला (हरियाणवी), चांचिसोआ ( गारो), फ्लेंडर्स दी जमीन विच (पंजाबी), घर जैसा कुछ (लडाखी), घोडे की सवारी (हिंदी), गुगल मॅट्रिमोनी (इंग्रजी), मैं निदा (हिंदी), मो बोऊ, मो गान (उडिया), मोनिहारा (बंगाली), पी फॉर पापराझी (हिंदी), पिलर्स ऑफ प्रोग्रेस : द एपिक स्टोरी ऑफ दिल्ली मेट्रो (इंग्रजी), प्राण प्रतिष्ठा (मराठी), रोटी कुण बनासी? (राजस्थानी) सावट (कोकणी) आणि सिवंता मन्न (तमिळ) यांचा समावेश आहे.

तीन मराठी चित्रपट
इंडियन पॅनोरमा 2024 साठी निवड झालेले 25 फीचर चित्रपटामध्ये तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांच्या घरात गणपती, निखिल महाजन यांच्या रावसाहेब आणि शशी चंद्रकांत खंदारे यांच्या जिप्सी या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.