‘कंट्री ऑफ फोकस’साठी इफ्फीत ऑस्ट्रेलियाची निवड

0
2

यंदाच्या इफ्फीत ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणजेच प्रकाशझोतातील देश म्हणून ऑस्ट्रेलिया या देशाची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त यंदाच्या इफ्फीत ऑस्ट्रेलिया देशातील सात उत्कृष्ट असे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटांतून ऑस्ट्रेलियाच्या विविधता असलेल्या संस्कृतीचे दर्शन प्रेक्षकांना घडणार असल्याचे इफ्फी आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

इफ्फीत दाखवण्यात येणऱ्या सात ऑस्ट्रेेलियन चित्रपटांमध्ये हलकेफुलके असे विनोदी चित्रपट, राहसपट तसेच अन्य जातकुळीचे चित्रपट व माहितीपट यांचा समावेश असेल असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. यातून प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियाच्या अस्मितेचे दर्शन घडणार आहेच.

ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधी येणार
यंदा ऑस्ट्रेलिया ही इफ्फीतील फोकस कंट्री असल्याने इफ्फीतील फिल्म बझारमध्ये भाग घेण्यासाठीही ऑस्ट्रेलियाचे एक विशेष असे प्रतिनिधी मंडळही येणार आहे. त्यात सहा ऑस्ट्रेलियन निर्मात्यांचाही समावेश असेल. ऑस्ट्रेलियात चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी उपलब्ध असलेल्या सुंदर अशा स्थळांची माहितीही हे प्रतिनिधी मंडळ फिल्म बझारमध्ये देणार आहे. सहनिर्मिती बझारसाठी ऑस्ट्रेलियाच्या ‘होम बिफोर नाईट’ या ऑस्ट्रेलियन प्रकल्पाचीही फिल्म बझारने निवड केलेली आहे.