नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. याशिवाय एक उपमुख्यमंत्री आणि 4 मंत्र्यांनी शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह यांच्यासह 6 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सुरेंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चौधरी हे नौशेराचे आमदार आहेत. निवडणुकीत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांना पराभूत केले होते. याशिवाय सकीना इट्टू, जावेद राणा, जावेद अहमद दार आणि सतीश शर्मा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.