1 कोटींचे ड्रग्स शिवोलीतून जप्त

0
1

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने शिवोली येथे छापा घालून सुमारे 1.1 कोटी रुपयांचे एलएसडी व इतर अमलीपदार्थ काल हस्तगत केले. अमलीपदार्थ विभागाने अलीकडच्या काळात केलेली ही एक मोठी कारवाई आहे. या प्रकरणी केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. संशयित आरोपी कुरिअर सेवेच्या माध्यमातून देशभरातील ग्राहकांना अमलीपदार्थ पाठवत होता. तो अमलीपदार्थ डार्कनेटच्या माध्यमातून मागवून घेत होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.