राज्यात आज, उद्या जोरदार पाऊस शक्य

0
7

राज्यातील काही भागांत दि. 16 आणि दि. 17 रोजी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दोन्ही दिवसांसाठी राज्यात पिवळ्या रंगाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. दरम्यान, काल 15 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मान्सून संपूर्ण देशातून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गेल्या 24 तासांत काणकोण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 27.4 मिमी., एवढा पाऊस कोसळला. त्यापाठोपाठ सांगे तालुक्यात 24.1 मिमी. एवढा पाऊस कोसळला. वाळपई येथे 6.2 मिमी., साखळी येथे 5.6 मिमी., पेडणे येथे 2.4 मिमी. इतका पाऊस कोसळला.