माझ्या मराठीची कौतुके

0
13

इंदू लक्ष्मण परब – मेणकुरे

आहे. अनेक संत, त्यांच्या रचना या भूमीला तिनेच तर दिल्या. ज्ञानदेवांचे ‘पसायदान’ संपूर्ण जगाला नवी दिशा आजपर्यंत दाखवत आहे. पोर्तुगीजांनाही या भाषेची भुरळ पडली, म्हणून तर त्यांनीसुद्धा या भाषेतून आपल्या धर्मग्रंथाची निर्मिती केली.

आपल्या भारत देशात विविध धर्म, विविध जाती आणि विविध भाषा आहेत. अशा या प्रदेशात उच्च-नीचता अशी काही नसावीच. तरीही येथे मी कसा श्रेष्ठ याची स्पर्धा लागलेली असते. या स्पर्धेत मात्र इतरांची कसोटी असते. कोण कधी अन्‌‍ कसा वागेल याची शाश्वती नसते. आणि या सगळ्यात घडतं काय तर एका सर्वसामान्य माणसाचा बळी. हो, त्याच माणसाचा बळी जो शांत असतो; ज्याला बोलायचं असतं खूप पण काहीच बोलत नाही.

आज मराठीला राष्ट्रीय स्तरावर दर्जा मिळाला याचा सार्थ अभिमान प्रत्येक मराठी भाषिकाला आहे. कितीतरी वर्षांपासून मराठीचा दर्जा खालावण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. फक्त एकच भाषा कशी श्रेष्ठ करावी याची चढाओढ उच्च स्तरावर होत असे. याला जबाबदार कोण याचा शोध घेणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा!
आपले सगळेच सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक साहित्य हे मराठीतच आहे. कितीतरी वर्षांपूर्वीचा इतिहास यामुळे आपल्याला जाणवतो, कळतो. या भाषेची गोडवी जितकी चाखावी तितकीच कमीच. प्रत्येक भाषा ही त्या-त्या प्रदेशाची खूण असते. कुठलीच भाषा मोठी वा छोटी मुळी नसतेच. ती आपापल्या तऱ्हेने मोठी होत जाते.
लहानपणापासूनच मुलांना योग्य वळण लागण्यासाठी आजी-आजोबांकडे ठेवले जाते. त्यांची मुळं घट्ट व्हावीत म्हणून माती घालून या रोपट्यांना घट्ट केले जाते. तशीच ही मातृभाषा जडणघडणीचे काम करत असते. या भाषेची गोडी कधीही न संपणारी आहे.
औदुंबराचे झाड पाण्यात पाय टाकून एका वृद्ध माणसासारखे बसले असे सांगणारी ही भाषाच तर आहे. अशी कितीतरी उदाहरणे, उक्ती, म्हणी, साहित्य या भाषेची गोडवी गात आहे.

व्यक्त व्हायचं एक सोपं आणि साधं साधन म्हणजे हीच ती भाषा. आम्ही घरामध्ये कोंकणी भाषेचा वापर करतो. पण तरी सांस्कृतिक कार्यक्रमांत जेव्हा व्यक्त व्हायची वेळ येते तेव्हा मी मराठीचेच बोट धरून चालत असते. मनातले भाव स्पष्टपणे आणि खंबीरपणे मांडायचे असल्यास मराठी वाचून पर्याय नाही असे मला कित्येकदा वाटते. अनेक वर्षे घरात बोलत असतानाही सहज पारडे झुकते ते मराठीकडेच. म्हणून कित्येकदा मला वाटते, ‘जाहलो खरेच धन्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी.’ हे वाक्य ऐकून ऊर भरून येते.