त्रिचीमध्ये विमानाची इमर्जन्सी लँडिंग

0
6

त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे त्रिची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. संध्याकाळी 5.40 वाजता विमानाने उड्डाण करताच विमानाच्या लँडिंग गिअरला जोडलेली हायड्रोलिक प्रणाली फेल झाली. त्यानंतर विमान सुमारे 3 तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतर 8.15 च्या सुमारास विमान सुरक्षितपणे त्रिची विमानतळावर उतरले. एअर इंडियाच्या या विमनात 141 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.