रतन टाटा अनंतात विलीन

0
4

>> शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी बुधवार 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुंबई पोलिसांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. मुंबईतील शवदाहिनीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते. कुलाबा येथील टाटा यांच्या निवासस्थानापासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक राजकीय नेते, उद्योजक, क्रीडा, मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज पोहोचले होते. बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले होते.
महाराष्ट्र, झारखंड व गुजरात सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले. कम्युनिटी हॉलमध्ये सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.