भाडेकरू पडताळणी अर्ज ज्या नागरिकांनी अजूनपर्यंत सादर केले नाहीत. त्यांनी पुढील 4 ते 5 दिवसांत सादर करावेत. भाडेकरू पडताळणी अर्ज सादर न करणाऱ्या घरमालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.
राज्य सरकारने नागरिकांना भाडेकरू पडताळणी अर्ज सादर करण्यासाठी काल 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. पोलिसांकडून भाडेकरूंची पडताळणी सुरू केली आहे.
भाडेकरू पडताळणी अर्ज आणि सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. काहीजणांकडून शुल्काबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.