हिज्ब उत तहरीर संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे बंदी

0
4

दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलताना केंद्रिय गृहमंत्रालयाने काल गुरूवारी जागतिक पॅन इस्लामिक फुटीरवादी हिज्ब-उत-तहरीर या संघटनेवर बंदी घातली आहे. मंत्रालयाने या संघटनेकडून भारताच्या लोकशाही प्रणाली आणि अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने, जिहादद्वारे लोकशाही सरकार उलथून टाकून भारतासह जागतिक स्तरावर इस्लामिक राज्य आणि खिलाफत स्थापन करणे अशी उद्दिष्टे असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी, तामिळनाडूतून संघटनेशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेने या संघटनेच्या ‘नकीब’ आणि ‘आमिर’ फैजुल रहमानला अटक केली. संशयितांवर हिज्ब-उत-तहरीर या संघटनेची विचारधारा विविध गटांमध्ये पसरवण्यासाठी अनेक गुप्त बैठका घेतल्याचा आरोप आहे.