सुरक्षेच्या मागणीसाठी बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टरांचे बेमुदत उपोषण

0
3

>> डॉक्टर बलात्कार-हत्याप्रकरण

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 8-9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येविरोधात कनिष्ठ डॉक्टरांनी उपोषण सुरू केले आहे. सुरक्षेसह आरोग्य सचिव एनएस निगम यांची हकालपट्टी करणे आणि आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करणे यासह कनिष्ठ डॉक्टर त्यांच्या 9 मागण्यांवर ठाम आहेत.

कोलकाता पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी धर्मताला परिसरातील डोरिना क्रॉसिंगवर डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले होते. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी ममता सरकारला 24 तासांचा अवधी दिला होता. ही मुदत
शनिवार 5 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता संपली. यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी आमरण उपोषण सुरू केले. आता डॉक्टरांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे.
धमक्या मिळाल्याने कनिष्ठ डॉक्टरांनी सुरक्षा मागितली कनिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, सरकारला 24 तासांचा अवधी दिला होता, मात्र 24 तासांनंतर आम्हाला धमक्या आल्या. त्यामुळे अजून आम्ही सुरक्षित नसल्याचे जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात 6 कनिष्ठ डॉक्टर उपोषणाला बसणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास हे उपोषण बेमुदत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत कोणाला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा डॉक्टरनी दिला आहे. आमच्या सुरक्षेच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत ममता सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत नाही, असे कनिष्ठ डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर रोजी सांगितले होते.

दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. बंगाल सरकारने निवासी डॉक्टर आंतररुग्ण विभाग आणि बाह्यरुग्ण विभागात काम करत नसल्याचे सांगितले होते. याला उत्तर देताना डॉक्टरांच्या वकिलांनी डॉक्टर सर्व आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.