खनिज डंप लिलावातून 100 कोटींचा महसूल

0
3

30 व्या खनिज डंप ई-लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जवळपास संपूर्ण 7.5 लाख मेट्रिक टन खनिज मालाची विक्री झाली आहे. राज्याला सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी काल दिली.
राज्यातील जेटी व अन्य ठिकाणी पडून असलेल्या सुमारे 7,56,518 मेट्रिक टन खनिज मालाचा लिलाव पाच लॉटमध्ये करण्यात आला. या मालाची किंमत 895 रुपये ते 1,680 रुपये प्रति टन अशी होती. खनिज माल लिलावात चौथ्या आणि पाचव्या लॉटमध्ये खनिज व्यावसायिकांमध्ये स्पर्धा झाल्याने खनिज मालासाठी निर्धारित किमतीपेक्षा जास्त दर मिळाला, असेही नारायण गाड यांनी सांगितले.