पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात त्यांच्या हस्ते अनेक विकसकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता. काँग्रेसला गणेशोत्सवाचाही तिरस्कार आहे, अशी टीका मोदींनी केली.
कर्नाटकमध्ये तर काँग्रेसने कहर केला. त्यांचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की त्यांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले. ज्या गणेशमूर्तीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नेमके काय घडले होते?
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे मंगळवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी गणेशमूर्ती जप्त करून ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवून नंतर पोलीस स्थानकात आणली.