रस्ता अपघात नियंत्रणाकडे सरकारचे दुर्लक्ष : पाटकर

0
1

दर 31 तासाला गोव्यातील रस्ता अपघातात एका व्यक्तीचा बळी जात असतो; मात्र असे असताना राज्य सरकार हे रस्ता अपघात होऊ नयेत अथवा ते नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचा आरोप काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
सध्या राज्यात रस्ता अपघातांचे सत्रच सुरू झालेले असून, पेडणे येथे ट्रक व दुचाकी अपघातात तिघा महिलांचा मृत्यू झाला. तसेच पेडण्यात ट्रक व टेम्पो अपघातात एक वाहनचालक ठार झाला. सांकवाळ येथे बस व दुचाकी अपघातात महिला ठार झाली. तसेच नानोड्यातील अपघातात दोघा तरुणांचा रस्त्यावर बळी गेल्याचे पाटकर म्हणाले.

दरम्यान, मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात महत्त्वाचे विभाग नसल्याने दक्षिण गोव्यातील रुग्णांना त्या इस्पितळातून गोमेकॉत हलवावे लागत आहे. परिणामी गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे पाटकर म्हणाले.