गोवा सरकार 2050 पूर्वी शून्य कार्बन उत्सर्जन टॅग मिळविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर गुजरात येथे उद्घाटन झालेल्या चौथ्या जागतिक पुनर्गुंतवणूक 2024 परिषदेच्या सीएम प्लेनरी सत्रात बोलताना काल केले.
गोवा सरकारने ‘गोंय विनामूल्य वीज’ योजना कार्यान्वित केली आहे. त्यात पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे अतिरिक्त फायदे आहेत. राज्यातील नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन आणि बळकट करण्यासाठी राज्यातील वातावरण पोषक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अक्षय ऊर्जेच्या विकासासाठी गोव्याच्या प्रयत्नांचे सादरीकरण केले आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि सहयोगींना गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले.