मंकीपॉक्सवरील लशीला परवानगी

0
3

कोरोनानंतर जगात भीती पसरवणाऱ्या मंकीपॉक्सच्या विषाणूचा समूळ नाश करण्यासाठी लसीकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लशीला परवानगी दिली आहे. सध्या भारतातही या विषाणूचा संशयित रुग्ण सापडला आहे. या गंभीर विषाणूचा नाश होण्यासाठी लसीकरण गरजेचे असून मंकीपॉक्सच्या पहिल्या लशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे.

बवेरियन नॉर्डिकने आणलेल्या मंकीपॉक्स विषाणूविरुद्ध लढणाऱ्या लशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली असून लवकरच लसीकरण सुरू करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. एमव्हीए बीएन असे या लशीला नाव देण्यात आले आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. स्मॉलपॉक्स, मंकीपॉक्स, ऑर्थोपॉक्ससारख्या घातक विषाणूंशी लढण्यासाठी ही लस काम करणार आहे.

या लशीचे 4 आठवड्यांच्या अंतराने 2 डोस देण्यात येईल. मंकीपॉक्स विरुद्ध लढण्यासाठी या लशीला मिळालेली मान्यता हे या विषाणूला नष्ट करण्यासाठी मोठे पूाल मानले जात आहे. मात्र या लशीची किंमत किती असेल याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच आफ्रिकेतील लोकांना ही दिली जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.