>> काँग्रेससोबत युती नसल्याचे स्पष्ट
>> पहिली यादी जाहीर
हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने एकट्याने विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काल सोमवारी दुपारी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 20 उमेदवारांची नावे आहेत.
आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत कोणतीही युती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील 90 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या. ‘आप’ने 10 जागा मागितल्या होत्या, पण काँग्रेसने 4 आणि 1 अशी 5 जागा देऊ केल्या होत्या. मात्र त्यावर एकमत झाले नाही.
राज्यातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
आपला 10 जागा हव्या होत्या
राज्यात आघाडीबाबत काँग्रेस-आप यांच्यात तीन बैठका झाल्या. इंडिया आघाडीअंतर्गत आपने काँग्रेसकडे 10 जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने आपला 5 जागा देऊ केल्या होत्या.दोन बैठकांनंतरही जागावाटपावर एकमत झाले नाही. यानंतर तिसऱ्या बैठकीत काँग्रेसने आणखी एक जागा देऊ केली. मात्र, या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
‘आप’सोबत जागावाटपाबाबत काँग्रेसच्या वतीने पक्षाचे प्रभारी दीपक बाबरिया यांच्याशी चर्चा सुरू होती, मात्र सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने ते घरीच विश्रांती घेत आहेत. त्यामुळे ‘आप’सोबत बैठक झाली नाही.