रत्नागिरी शहरात सोमवारी बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकाने पाण्यातून गुंगीचे औषध पाजून 19 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोलकाता येथे आरजी कार हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरसोबत झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरण, बदलापुरात चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचाराने देश पेटून उठला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी परिचारिकेने तिच्या कॉलेजमधून घरी जाण्यासाठी रिक्षा केली. त्यानंतर वाटेत रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ते पाणी जरा कडवट असल्याचे तिला जाणवले, त्यानंतर ती लगेचच बेशुद्ध पडली. बेशुद्ध झाल्यानंतर रिक्षाचालकाने तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर आत्याचार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून पसार झाला. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा पीडितेने तिच्या कुटुंबीयांना बोलावले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.