जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसचे जागावाटप ठरले

0
6

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. काल या दोन्ही प्रमुख पक्षांसह अन्य घटक पक्षांतील जागावाटप निश्चित झाले.
जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 51 जागांवर निवडणूक लढेल, तर काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. 5 जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला, तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत काल जागावाटपाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे.