वाहने थांबवली, चौकशी केली अन्‌‍ 23 जणांना घातल्या गोळ्या

0
6

>> पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील घटना

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये रविवारी रात्री बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी 23 प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण पंजाबी वंशाचे प्रवासी होते. हल्लेखोरांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची ओळखपत्रे तपासली. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पंजाबमधून येणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

सविस्तर माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेलमधील राराशममध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांनी राराशम भागात महामार्ग रोखला होता. त्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका बसमधील पंजाबी वंशाच्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घातल्या. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी 12 वाहने पेटवून दिली आणि डोंगरावरून पळ काढला.
या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) घेतली आहे. मात्र, आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सैनिकांना लक्ष्य केले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.