पाकिस्तानमध्ये दोन अपघातांत 37 मृत्यू

0
6

पाकिस्तानमध्ये काल रविवारी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये सुमारे 40 नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताच्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या अपघातांमध्ये 11 भाविकांसह 37 जणांचा मृत्यू झाल्याची झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जण जखमी झाले.

पाकिस्तानमध्ये इराणमधून 70 शिया यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस बलुचिस्तान येथील मकरान कोस्टल महामार्गावरून चुकल्याने पहिला अपघात झाला. या भाविकांना पंजाबच्या दिशेने जायचे होते. या मार्गावर भाविकांचा अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर 35 भाविक जखमी झाले. बहुतेक लोक लाहोर किंवा गुजरानवालाचे रहिवासी होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

पीओकेमध्ये दुसरा अपघात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दुसरा अपघात झाला आहे. 35 जणांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्याने पाकिस्तानमधील दुसरा अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिक लोक बसमधून मृतदेह बाहेर काढत आहेत, तर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश असून ते सर्व साधनोती जिल्ह्यातील रहिवासी आहेत.