>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती
पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेच्या मसुद्यावर संबंधित पंचायतींच्या सूचना, हरकती जाणून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने गोव्यातील 108 गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना जारी केली आहे.
या सूचनेबाबत संबंधित ग्रामपंचायतीबरोबरच संबंधित आमदारांकडूनही सूचना, हरकती जाणून घेतल्या जाणार आहेत. सरकारला प्राप्त होणाऱ्या सूचना आणि हरकती एकत्रित करून केंद्रीय मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. या मसुद्यावर राज्यांना त्यांच्या सूचना देण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.