विनेश फोगाटची याचिका फेटाळली

0
3

कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचूनही 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगाट हिला 7 ऑगस्टला अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर विनेशने क्रीडा लवाद न्यायालयाकडे (सीएएस) याचिका दाखल करत आपल्याला रौप्यपदक द्यावे, अशी मागणी केली होती; मात्र तिची याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशचे आणि पर्यायाने भारताला एका पदकाला मुकावे लागले आहे. सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. निर्धारित श्रेणीत विनेशचे वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरली विनेशने सीएएसकडे याचिका दाखल केल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर निकाल आला असून, तिची याचिका फेटाळण्यात आली आहे.