‘विकसित भारता’साठी पाया रचला : राष्ट्रपती

0
4

78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 मिनिटे देशाला संबोधित केले. भारताला विकसित राष्ट्राच्या दर्जाकडे नेण्याच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांच्या नवीन युगासाठी पाया रचला गेला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताच्या प्रभावी आर्थिक वाटचालीवर प्रकाश टाकला. 2021 ते 2024 दरम्यान सरासरी वार्षिक विकासदर वाढीचा दर 8 टक्के राहून देश सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला. आता भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे ही अभिमानाची बाब आहे आणि आम्ही लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहोत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या बरोबरीने 2047 पर्यंत भारताला राष्ट्रामध्ये रूपांतरित करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावरही त्यांनी भाष्य केले.