हिंडेनबर्ग अहवालाची संसदीय समितीद्वारे चौकशी करा ः काँग्रेस

0
3

>> सेबी, अदानी समूहाने आरोप फेटाळले

अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केलल्या अहवालात सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी समूहाशी निगडीत ऑफशोअर कंपनीत भागीदारी केली असल्याचा दावा केला होता. या अहवालावरून तपासाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जिवलग मित्राला (अदानी) वाचवण्याचा कट रचल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर सेबीप्रमुख माधुरी पुरी बुच यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फतच योग्य चौकशी होऊ शकते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्ग अहवालाबाबत गंभीर आरोप केले आहेत. 2022 मध्ये सेबीचे प्रमुख झाल्यानंतर लगेचच माधवी पुरी बुच यांनी गौतम अदानी यांच्यासोबत दोन बैठका घेतल्याचा दावा रमेश यांनी केला.

माधवी, अदानींनी फेटाळले आरोप
माधवी बुच यांनी हिंडेनबर्ग अहवालात आपल्यावरील आरोपांना निराधार आणि चरित्र हननाचा प्रयत्न असे म्हटले आहे. अदानी समूहाने अदानी समूहावरील आरोप यापूर्वीच निराधार सिद्ध झाले आहेत. सखोल तपासानंतर, सर्वोच्च न्यायालयाने आरोप फेटाळून लावले असल्याचे म्हटले आहे.