>> यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकार
बांगलादेशात सत्तांतर झाले असून या ठिकाणी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला. त्यानंतर बांगलादेशात हंगामी सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी हंगामी सरकारची स्थापना बांगलादेशात करण्यात आली आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी या हंगामी सरकारला शपथ दिली. युनूस यांच्यासह 13 जणांनी ही शपथ घेतली. शपथविधीनंतर युनूस यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.
मोहम्मद युनूस हे अर्थतज्ज्ञ आहेत. बांगलादेशातील गरिबी कशी कमी होईल यासाठी त्यांनी काही सूचना केल्या होत्या. त्यासाठीच त्यांना 2006 साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवले गेले होते.
यूनुस यांनी 2007 साली त्यांनी आपला राजकीय पक्षही काढला होता. नागरीक शक्ती असे या पक्षाचे नाव होते. 2008 मध्ये ते या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढणार होते. पण काही कारणांमुळे ते आणि त्यांचा पक्ष निवडणुकीला सामोरा गेला नाही.
दरम्यान, शपथविधीसाठी मोहम्मद यूनुस हे गुरूवारी दुपारी पॅरिसवरून ढाकाला पोहोचले होते. त्यांना विमानतळावर लष्कर प्रमुख भेटले होते. त्याचवेळी सामाजिक क्षेत्रातले लोकही भेटले होते. त्यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता.