विनेश फोगाटची कुस्तीमधून निवृत्ती

0
8

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अधिक वजन भरल्यामुळे अपात्र ठरलेली हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे.
विनेशने गुरुवारी सकाळी 5.17 वाजता सोशल मीडियावर (एक्स) याबद्दल 5 ओळी लिहिल्या. त्यात तिने, कुस्तीला आई संबोधले आहे. यात तिने, आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरले. माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे. माझ्याकडे आता यापेक्षा जास्त ताकद नाही. कुस्ती 2001-2024 ला अलविदा, मी तुमच्या सर्वांची सदैव ऋणी राहीन. माफ करा. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी त्यांनी बुधवारी रात्री अपात्रतेविरुद्ध अपील दाखल केले. त्यांना संयुक्तपणे रौप्य पदक देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी क्रीडा लवाद न्यायालयाकडे केली. ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे विनेश बेशुद्ध झाली आणि तिची प्रकृती खालावल्याने तिला पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करावे लागले. त्यानंतर तिला आता पॉलीक्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विनेश फोगाटची सुनावणी काल गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता होणार होती, मात्र आता या प्रकरणावर आज शुक्रवारी दुपारी दीड वाजता सुनावणी होणार आहे. विनेशची बाजू वकिल हरीश साळवे लढवणार आहेत.