बांगलादेशची संसद विसर्जित

0
5

बांगलादेशातील तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर काल राष्ट्रपतींनी संसद विसर्जित केली. बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास संसद बरखास्त केली. पाकिस्तानच्या तिन्ही लष्कर प्रमुख आणि अनेक राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसक आंदोलनांतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी देशही सोडला. यानंतर सध्या बांगलादेशातील वातावरण प्रचंड अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींनी वेग धरला आहे. त्यापूर्वी बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी संसद विसर्जित केली. मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.