यांत्रिक होडी उलटली; 11 कामगार बचावले

0
6

वाडी-बाणावली येथे खवळलेल्या समुद्रात काल सकाळी मासेमारी करण्यात गेलेली यांत्रिक लहान होडी उलटली. या बोटीवर 11 कामगार होते. त्यांनी पोहत किनाऱ्यापर्यंत येऊन जीव वाचविला. मासेमारी करून परत येत असताना जोराच्या लाटांबरोबर ही होडी उलटली व ते पाण्यात पडले. बाणावली किनाऱ्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली. बाणावली येथील पोपू फर्नांडिस यांच्या मालकीची ही यांत्रिक बोट होती. या दिवसांत समुद्र खळवलेला असून, हवामान खाते व मत्स्योद्योग खात्याने मासेमारीसाठी बोटी समुद्रात न सोडण्यात सूचना केली होती. 5 दिवसांपूर्वी आणखी एक बोट उलटून 13 कामगार बुडण्यापासून वाचले होते.