
येथील एका हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठेवण्यात आलेले गुजरातमधील ४४ कॉंग्रेस आमदार आज गुजरातला रवाना होणार आहेत. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर या आमदारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी होती. मात्र याच दरम्यान प्राप्ती कर खात्याने शिवकुमार यांच्या विविध ठिकाणांवर सुमारे ३ दिवस छापे घालून ११ कोटी रुपयांची रोकड जप्त केले.
गुजरातमधील कॉंग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्याने स्थानिक नेतृत्वाने भाजपवर आरोप केले होते. तसेच आणखी आमदारांनी दबावाखाली राजीनामे देऊ नयेत यासाठी ४४ आमदारांना एका रात्रीत बंगळुरूत हलवले होते.