मिरामार येथील जीर्ण पदपूल हटवणे सुरू

0
4

मिरामार येथील शारदा मंदिर विद्यालयाजवळील जीर्ण पदपूल अखेर जमीनदोस्त करण्याचे काम कालपासून सुरू केले आहे. या पदपुलामुळे धोका निर्माण झाला होता. हा पदपूल जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने मिरामार ते विज्ञान केंद्रापर्यंतचा रस्ता 9 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मिरामार सर्कल ते टोंका मार्गावरून वळविण्यात आली आहे, असे वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.