गोव्याच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 102 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या मालवाहू जहाजाला शुक्रवारी मोठी आग लागली. हे जहाज मुंद्राहून श्रीलंकेतील कोलंबोला जात होते. आगीची माहिती मिळताच, भारतीय तटरक्षक दलाने ताबडतोब एक आपले जहाज मदतीसाठी तिकडे वळवले आणि त्या ठिकाणी पोहोचत मदतकार्य सुरू केले. तसेच, हवाई पाहणीसाठी भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमानही पाठवण्यात आले. हे जहाज आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक वस्तू (आयएमडीजी) माल घेऊन जात असल्याची माहिती आहे आणि या जहाजाच्या पुढील भागात स्फोट होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.