आणखी एका मशिदीत सापडल्या 94 भग्न मूर्ती

0
47

भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) सोमवारी भोजशाला कमाल मौला मशिदीबाबतचे सर्व्हेक्षण अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठापुढे सादर केला. पुरातत्व खात्याचे वकील हिमांशू जोशी यांनी दोन हजार पानांचा हा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. सर्वेक्षणात या ठिकाणी 94 भग्न मूर्ती सापडल्या आहेत, असे अहवालात नमूद केले असल्याचे हिंदू पक्षकारांचे वकील हरिशंकर जैन यांनी काल सांगितले. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार आहे.