- अलिशा अशोक गडेकर
शोधूनही मिळत नाही त्या सहानुभूती
निरागस विश्वातल्या ह्या प्रासंगिक उक्ती
जीवनाचे पुस्तक गुदमरत चाललेय
मोकळा श्वास घेणार तरी कधी? अहो देवा,
आणखी किती परीक्षा घेणार?
प्रयत्नांचे शिखरही बांधले
शिखराला दुफळी पडल्या
तरीही पद मागे न वळले
कोसळताना ते शिखर पाहून
मन गाभाऱ्यात घुसले
मानवाची विचारधारा
भयचिंतेत बावरली
आणि मग बाहेरील विश्व
पाहणार तरी कधी?
अहो देवा,
आणखी किती परीक्षा घेणार?