सुरक्षेसाठीच धबधब्यांवर तात्पुरती बंदी : राणे

0
12

पावसाने राज्यात कहर माजवल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात गिर्यारोहण व धबधब्यांवरील सहलींवर सध्या तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पाऊस व वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही बंदी घातली आहे. पर्यटक व स्थानिकांच्या सुरक्षेसाठी ही बंदी घातली असून, त्यांनी या बंदीचे पालन करावे, असे आवाहन वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले.

या घडीला पर्यटकांनी साहसी पर्यटनांपासून दूर रहाव. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अन्य सुरक्षित अशा पर्यटन स्थळांकडे आपला मोर्चा वळवावा, असे राणे यांनी म्हटले आहे. राज्यात येणारे पर्यटक तसेच स्थानिक सुरक्षित रहावेत व ते संकटात सापडू नयेत, यासाठी सरकारने बंदीचा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. रविवारी सुमारे 40 पर्यटक पाली-सत्तरी येथील धबधब्यावर गेले असता पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते अडकून पडले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने धबधब्यांवर बंदीचा निर्णय घेतला होता.