पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल रशियात दाखल झाले. 5 वर्षानंतर ते रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. मॉस्को येथील वनुकोवो-2 आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. यावेळी रशियन सैन्याने भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवली. यानंतर मोदी कार्लटन हॉटेलमध्ये पोहोचले जेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. मोदी हे मंगळवार दि. 8 जुलै रोजी 22व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदींची रशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ते 2019 मध्ये रशियाला गेले होते.