छोट्या व्यवसायांसाठी आता काही परवाने बंधनकारक

0
4

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 24 किंवा त्याहून अधिक युनिट्स असलेली निवासी संकुल, तसेच पशु-पक्षीपालन ते पिठाच्या गिरण्यांसारख्या लहान व्यवसायांसाठी जल आणि वायू प्रदूषणाशी संबंधित परवाने बंधनकारक केले आहेत. प्रदूषण मंडळाने यासंबंधीची सूचना काल जारी केली.
प्रदूषण मंडळाकडून हे परवाने मिळवण्यात अयशस्वी ठरणारी निवासी संकुले किंवा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश जारी केले जाणार आहेत, असा इशाराही देण्यात आला आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व्हिसिंग स्टेशन, वॉशिंग सेंटर्स, बेकरी युनिट्स, लाँड्री, 5000 आणि त्याहून अधिक पक्ष्यांची पोल्ट्री, फ्लोअर आणि राइस मिल्स, हॉटेल्स, गेस्ट हाउस रिसॉर्ट, बॅन्क्वेट हॉल, ओपन एअर हॉल्स, पार्टी व्हेन्यू, मॅरेज हॉल, 15 हून अधिक जनावरांचा गोठा, 15 नगांसह डुक्कर पालन केंद्र, रेस्टॉरंट्स, सॉ मिल्स, गोशाळा, सुतारकाम युनिट्स, चिरे खाण यांना जल आणि वायू प्रदूषण परवाने बंधनकारक केली आहे.
याशिवाय 24 किंवा अधिक फ्लॅट्स असलेली इमारती यांनाही सदर परवानग्या घेणे सक्तीचे केले आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाबाबतच्या तक्रारी स्थानिक पोलिसांकडे पाठवाव्यात, असेही सूचनेत म्हटले आहे.