‘विकीलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांजची सुटका

0
5

विकीलिक्स वेबसाइटचे संस्थापक व पत्रकार ज्युलियन असांज याची अखेर काल ब्रिटिश तुरुंगातून सुटका करण्यात आली. ज्युलियन असांज याने अमेरिकेसोबत करार केला असून, त्याच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. 5 वर्षे लहानशा कोठडीत घालवल्यानंतर मंगळवारी असांज बेलमार्श तुरुंगातून बाहेर पडला. त्यानंतर दुपारी त्याला स्टॅनस्टेड विमानतळावर सोडण्यात आले, तिथून विमानाने तो यूकेतून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.
2010-11 मध्ये विकीलिक्सच्या खुलाशानंतर अमेरिकेने ज्युलियन असांज याने त्यांच्या देशात हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. त्याने गुप्त फाईल प्रकाशित केली. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले. मात्र, ज्युलियन असांजने हेरगिरीचे आरोप नेहमीच फेटाळले आहेत. गेल्या 13 वर्षांपासून तो कायदेशीर लढाई लढत होता.
अमेरिकन सरकारसोबत झालेल्या कराराचा भाग म्हणून असांजने हेरगिरी केल्याची कबुली दिली आहे. या करारानंतर लंडन उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला अमेरिकेसोबत झालेल्या करारानुसार, आरोप मान्य केल्यानंतर त्यांना 62 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाईल, जी त्याने आधीच भोगली आहे. त्याने आतापर्यंत ब्रिटिश तुरुंगात 1901 दिवसांची शिक्षा भोगली आहे.